धक्कादायक ! सरकारी रुग्णालयात झालेल्या बलात्कारानंतर कोरोना रुग्णाचा मृत्यू
देश बातमी

धक्कादायक ! सरकारी रुग्णालयात झालेल्या बलात्कारानंतर कोरोना रुग्णाचा मृत्यू

नवी दिल्ली : कोरोना रुग्णावर सरकारी रुग्णालयात कर्मचाऱ्याकडून बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये उघडकीस आली. बलात्कारानंतर महिलेचा २४ तासांच्या आत मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जवळपास एका महिन्यानंतर पोलिसांना संशयित आरोपीला अटक केल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

४३ वर्षीय पीडित महिलेला ६ एप्रिलला भोपाळ मेमोरियल हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये दाखल केलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने डॉक्टरांकडे यासंबंधी तक्रार करत आरोपीची ओळख पटवली होती. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, यानंतर महिलेची प्रकृती ढासळली आणि तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. त्याच संध्याकाळी महिलेचा मृत्यू झाला.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी ४० वर्षीय संतोष अहीवारल याला अटक केली आहे. त्याच्यावर खटला चालवण्यात येणार असून सध्या भोपाळ सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे.