गोमूत्र पिते म्हणूनच मला कोरोना झालेला नाही – भाजप खासदार
देश बातमी

गोमूत्र पिते म्हणूनच मला कोरोना झालेला नाही – भाजप खासदार

नवी दिल्ली : कोविडमुळे होणारा फुफ्फुसातील संसर्ग गोमूत्र प्यायल्याने बरा होऊ शकतो, असे भाजपच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटले आहे. गोमूत्र प्यायल्याने कोरोनासुद्धा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी स्वतःचे उदाहरण देत आपण रोज गोमूत्र पीत असल्याने कोरोना झाला नसल्याचे सांगितले. एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यानंतर त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशी गायीचे गोमूत्र आपण प्यायलो तर फुफ्फुसाचा संसर्ग होत नाही. मला खूप त्रास होतो. पण मी रोज गोमूत्र पिते. यामुळेच कोरोनासाठी कोणतेही औषधे घ्यायची गरज लागत नाही. मला कोरोनाही झाला नाही, असे प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या. गोमूत्र हे आपल्यासाठी जीवनदायी असल्याने प्रज्ञा ठाकूर यांनी सांगितले.

प्रज्ञा ठाकूर रविवारी बैरागढ येथील एका कार्यक्रमात ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरच्या उद्घाटनासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आपण आजारी असल्याने घरी राहूनच लोकांची मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास यांनी हा व्हिडिओ ट्विट करत केंद्रिय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना टॅग करत हे खरे आहे का? असा प्रश्न केला आहे.