बातमी विदर्भ

राज्यातील या जिल्ह्यात पुन्हा जमावबंदीचे आदेश; असे आहेत नियम

गडचिरोली : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध लादण्यात आले आहेत. तसंच विविध सण-उत्सवांमुळे गर्दी होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात दिनांक २९ ऑगस्टपासून १२ सप्टेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी अथवा संबंधित पोलीस स्टेशन अधिकारी (जे शक्य असेल ते) यांच्या पूर्व परवानगी शिवाय कोणीही मिरवणूक काढू नये, पाच इसम किंवा त्यापेक्षा जास्त इसम सार्वजनिक जागेत, सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर दिनांक २९ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाही, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.