गुजरातनंतर कर्नाटकातील परिस्थिती भयानक; अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीबाहेर रांगा
देश बातमी

गुजरातनंतर कर्नाटकातील परिस्थिती भयानक; अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीबाहेर रांगा

बंगळुरु : देशात कोरोनाचा कहर सुरु असताना गुजरात नंतर आता कर्नाटकामध्येही परिस्थिती भयानक असल्याचे समोर आले आहे. कर्नाटकमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटकातील एका बंगळुरू शहरात गेल्या चार दिवसांमध्ये पन्नास हजारांहून अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत असल्याने स्मशानभूमी समोर अक्षरक्ष: रुग्णवाहिकेच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी तब्बल वीस-वीस तासांचा कालावधी लागत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बंगळुर शहरातल्या अनेक स्मशानभूमींसमोर शेकडो रुग्णवाहिका सध्या थांबून आहेत आणि याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी तत्काळ याची दखल घेत निर्बंध लागू करण्याची घोषणा करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे आजच येडियुरप्पा यांना डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या आठवड्यात ते कोरोना पॉझिटिव्ह आले होते.

बंगळुरू शहरातल्या अनेक स्मशानभूमीसमोर कोरोनामुळे ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यांचे मृतदेह घेऊन रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. मात्र रुग्णांची संख्या इतकी आहे की लवकर अंत्यसंस्कार होऊ शकत नाहीत. अपुरी यंत्रणा असल्यामुळे अंत्यसंस्कार करायला वेळ लागत आहे. त्यामुळेच अनेक स्मशानभूमीसमोर रुग्णवाहिकेच्या रांगा लागल्या आहेत.