आयटी रिटर्न भरण्यास पुन्हा मुदतवाढ; पण…
देश बातमी

आयटी रिटर्न भरण्यास पुन्हा मुदतवाढ; पण…

नवी दिल्ली : तुम्ही आयटी रिटर्न भरले नसेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. सरकारने आयटी रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अजुनही संधी गेलेली नाही. आयकर परतावा भरण्यास ३१ डिसेंबर शेवटची तारीख असल्याने सर्व्हरवर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे सोशल मीडियावर आयकर भरण्यास मुदतवाढ देण्याती मागणी करण्यात येत होती. यावर केंद्र सरकारने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सरकारने आयटी रिटर्नसाठी मुदतवाढ दिली असली तरी तिचा कालावधी कमी आहे. त्यामुळे आयटी रिटर्न भरला नसेल तर तात्काळ भरा अन्यथा तुम्हाला नंतर अडचणीचा सामना करावा लागू शकतो. सामान्य लोकांना, नोकरदारांना आयकर भरण्यास १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजेच ही मुदतवाढ केवळ १२ दिवसांसाठी देण्यात आली आहे. अर्थमंत्रालयाने याबाबत घोषणा केली आहे.

तसेच ज्यांच्या खात्यांचे ऑडिट शिल्लक आहे त्यांना आणि त्यांच्या पार्टनरसाठी २०२०-२१चा आयकर भरण्यासाठी १५फेब्रुवारीची नवीन डेडलाईन देण्यात आली आहे. तर जीएसटी भरण्यासही २८ फेब्रुवारीपर्यंच मुदतवाढ देण्यात आली आहे. २०१९-२० (असेसमेंट वर्ष २०२०-२१) मध्ये जवळपास ४३.७ दशलक्ष आयटी रिटर्न २८ डिसेंबरपर्यंच दाखल झाल्याचे आयकर विभागाने मंगळवारी स्पष्ट केले आहे.