महापालिका सहायक आयुक्तांवर फेरीवाल्याचा प्राणघातक हल्ला; तुटली तीन बोटं
बातमी मुंबई

महापालिका सहायक आयुक्तांवर फेरीवाल्याचा प्राणघातक हल्ला; तुटली तीन बोटं

ठाणे : महापालिकेच्या सहायक आयुक्तांवर फेरीवाल्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यांत आयुक्तांची तीन बोटे तुटली आहेत. सहायक आयुक्त कल्पिता पिंगळे यांच्यावर एका फेरीवाल्याने हा जीवघेणा हल्ला केला आहे. कल्पिता पिंपळे या आज कासारवडवली भागात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत होत्या, यादरम्यान त्यांच्यावर धारधार शस्त्राने हा जीवघेणा हल्ला केला आणि यामध्ये त्यांची तीन बोटं तुटली असून डोक्याला देखील गंभीर दुखापत झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सध्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर सुरूवातीला ठाण्यामधील वेदांता रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांना पुढील उपचारांसाठी ज्युपिटर रूग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. अशा प्रकारे भर दिवसा एखाद्या महिला अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने खबळबळ उडाली आहे.

कासारवडवली भागात मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत व परप्रांतीय फेरीवाले असतात. या ठिकाणी कारवाई सुरू असताना त्या फेरीवाल्याने अचानक कोयत्याने प्राणघातक हल्ला चढवला. यावेळी त्यांच्यासोबत असलेला अंगरक्षक देखील त्यांच्या मदतीला धावून आला होता, त्यामळे तो देखील जखमी झाला आहे. त्याच्यावर देखील उपचार सुरू आहेत.