मिशन अनलॉक; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
देश बातमी

मिशन अनलॉक; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतला लॉकडाउन हळूहळू उठवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. दिल्लीतल्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. वाढती संख्या पाहता लॉकडाउन करण्यात आला होता. मात्र, आता रुग्णसंख्या कमी होत असल्यानं दिल्लीतला लॉकडाउन टप्प्याटप्प्याने हटवण्यात येईल असे केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केजरीवाल म्हणाले, ‘आम्ही दिल्लीची जनता आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने दिल्लीतला लॉकडाउन हळूहळू हटवणार आहोत. मात्र, यावेळी कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढणार तर नाही ना याची काळजी घेतली जाईल. दिल्लीतल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत आता मोठी घट होत आहे. कोरोना विरुद्धच्या या लढाईमध्ये दिल्लीवासियांची मेहनत फळाला येत आहे. दिल्लीतली परिस्थिती सुधारत चालली आहे आणि म्हणूनच दिल्ली आता अनलॉकसाठी सज्ज आहे. बांधकाम क्षेत्र आणि कारखाने सोमवारपासून सुरु करण्यात येतील.

आपल्याला हे लक्षात ठेवायला हवं की कोरोना फक्त कमी झाला आहे, संपलेला नाही. म्हणूनच आपण दिल्लीला हळूहळू अनलॉक करत आहोत. एकावेळी उठवला तर लागण होण्याचं प्रमाण वाढू शकतं. या अनलॉकसाठी आम्ही मजुरी करणाऱ्या, गरीब लोकांना समोर ठेवून विचार केला असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले आहे.