‘ले गई दिल मेरा…’ वर थिरकली तारका, पोरं झाली घायाळ, धनुभाऊसमोरच पोलिसांचा लाठीचार्ज
बातमी मराठवाडा

‘ले गई दिल मेरा…’ वर थिरकली तारका, पोरं झाली घायाळ, धनुभाऊसमोरच पोलिसांचा लाठीचार्ज

गेल्या वर्षभरापासून आतुरतेनं वाट पाहणाऱ्या गणरायाचे आगमन झाले आहे. सर्वत्र लाडक्या बाप्पाचा खास पाहुणचार केला जात आहे. पण, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (dhanjay munde) यांच्या परळीत (parali) पहिल्याच दिवशी लावणीचा कार्यक्रम भरवण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे, त्यामुळे बेभान झालेल्या तरुणावर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बीडच्या परळीतील नाथ प्रतिष्ठानच्या गणपती उत्सवाला (parali nath pratishthan ganpati) सुरुवात झाली आहे. माजी सामजिक न्याय मंत्री आ धनंजय मुंडे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले होते. पण, पहिल्याच कार्यक्रमात गोंधळ झाला. कलाकारांना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी एकच गोंधळ केला, त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठिचार करण्यात आला. अति उत्साही तरुणांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला.

विशेष म्हणजे, आठदिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री सिने तारका अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी, हेमांगी कवी, तेजा देवकर, प्राजक्ता गायकवाड, पूनम कुडाळकर यांचा विवीध गाण्यावर भन्नाट डान्स झाला, तोच पाहण्यासाठी तरुणांची एकच गर्दी उसळली.

मराठी सिने अभिनेत्रींचे नृत्य पाहण्यासाठी गर्दी झाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये काही तरुण जखमी झाले. पोलिसांकडून काठ्याचा प्रसाद मिळत असल्याने कार्यक्रमातून अनेकांनी काढता पाय घेतला. या लाठचार्जमुळे सांस्कृतिक कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. तसंच गणपतीच्या पहिल्याच दिवशी लावण्याचा कार्यक्रम भरवण्यात आल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.