पेट्रोल-डिझेलचे पुन्हा वाढले दर; पाहा आजच्या किमती
देश बातमी

पेट्रोल-डिझेलचे पुन्हा वाढले दर; पाहा आजच्या किमती

नवी दिल्ली : देशभरामध्ये गुरुवारी म्हणजेच ३० सप्टेंबर रोजी इंधनदरवाढ करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर २५ पैसे प्रती लिटरने वाढवण्यात आले असल्याने कालपर्यंत १०१.३९ रुपयांना मिळणारं पेट्रोल आज १०१.६४ रुपयांना मिळत आहे. तर डिझेलच्या दरांमध्ये ३० पैसे प्रती लिटरने वाढ करण्यात आली आहे. कालच्या ८९.५७ रुपये प्रती लिटरवरुन आज डिझेलचे दर ८९.८७ रुपये प्रती लीटरवर पोहचले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इंडियन ऑइल कॉर्परेशनने दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर १०७.७१ रुपये प्रती लीटर तर डिझेलचे दर ९७.५२ रुपये प्रती लिटरपर्यंत पोहचले आहेत. देशातील चार प्रमुख महानगरांपैकी मुंबईमध्ये इंधनाचे दर सर्वाधिक आहेत. राज्यांमध्ये तेथील स्थानिक सरकारकडून म्हणजेच राज्य सरकारांकडून आकारण्यात येणाऱ्या करांमुळे इंधनाच्या दरांमध्ये तफावत जाणवते. मागील सहा दिवसांमध्ये डिझेलचा दर प्रती लीटरमागे १ रुपया २५ पैशांनी वाढलेत.

भारतीय तेल कंपन्यांनी २४ सप्टेंबर रोजी २० पैशांनी, २६ सप्टेंबर रोजी २५ पैशांनी डिझेलचे दर वाढवले होते. तर २७ सप्टेंबर रोजीही डिझेलचे दर २५ पैशांनी वाढवण्यात आलेले. काल पुन्हा एकदा २५ पैशांनी दरवाढ करण्यात आली तर आज लीटर मागे ३० पैशांनी दरवाढ झालीय. पेट्रोलचे दर मागील २२ दिवसांपासून स्थीर होते मात्र आता ते सुद्धा कालपासून वाढवण्यात आलेत. दोन दिवसांमध्ये पेट्रोल ४५ पैसे प्रती लीटरने महाग झालं आहे.