वर्षभरात अनुसुचित जातीचे ‘स्टॅन्डअप इंडिया’ योजनेतून १००० उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट – डॉ.प्रशांत नारनवरे
बातमी मुंबई

वर्षभरात अनुसुचित जातीचे ‘स्टॅन्डअप इंडिया’ योजनेतून १००० उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट – डॉ.प्रशांत नारनवरे

मुंबई : केंद्र व राज्य शासनाची ‘स्टॅन्डअप इंडिया मार्जीन मनी’ ही योजना अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक न्याय विभाग कटिबद्ध आहे. येणाऱ्या वर्षभरात अनुसुचित जातीचे ‘स्टॅन्डअप इंडिया’ योजनेतून १००० उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट असून जास्तीत जास्त लोकांनी ह्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांनी केले आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालय, राज्याच्या समाज कल्याण विभागाच्यावतीने आयोजित नॅशनल एससी-एसटी हब संमेलनात डॉ. नारनवरे बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालय, राज्याच्या समाज कल्याण विभागाच्यावतीने आयोजित नॅशनल एससी -एसटी हब संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय सचिव बी.बी. स्वेन, सहसचिव श्रीमती मर्सी इपाओ, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड अॅफरमेटिव्ह अॅक्शनचे चेअरमन सुनील झोडे, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीचे अध्यक्ष सुनील शिंदे, डॉ. विजय कलंत्री, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत कुमार, उद्योग विभागाच्या अतिरिक्त आयुक्त इशिता गांगुली-त्रिपाठी, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाचे क्षेत्रीय व्यवस्थापक मनोजकुमार सिंग आदी उपस्थित होते.