बातमी मुंबई

मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञांची गळफास घेऊन आत्महत्या

नवी मुंबई : नवी मुंबईत सानपाडा परिसरातील जॅक अँड जिल रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रेम पहूजा यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. घरातील गॅलरीच्या अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

डॉक्टर प्रेम पहूजा यांची पत्नी कल्याण येथे राहात असल्याने डॉक्टर नवी मुंबईत एकटेच राहत होते. दुपारी साधारण १ वाजता रुग्ण आला असल्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी डॉक्टर प्रेम यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. बऱ्याच वेळ डॉक्टरांना फोन केला मात्र काहीच रिप्लाय आला नाही.

शेवटी पोलिसांनी घरात प्रवेश केल्यानंतर डॉ. प्रेम पहुजा गळफास घेतल्याचे दिसले. डॉक्टर प्रेम पहूजा हसतमुख आणि दिलदार व्यक्तिमत्व असलेले नवी मुंबई परिसरात प्रचलित डॉक्टर होते. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्याप कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट न सापडल्याने मृत्यचे गूढ वाढले आहे.

सानपाडा पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पालिका रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.