1 जूननंतर राज्यात असे असेल लॉकडाऊन
बातमी महाराष्ट्र

1 जूननंतर राज्यात असे असेल लॉकडाऊन

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. राज्य सरकारनं 15 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर त्यात वाढ करून 1 जूनपर्यंत वाढवण्यात आला. हा लॉकडाऊन 1 जून सकाळी सात वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे 1 जून राज्यात लॉकडाऊनची कशी स्थिती असेल लॉकडाऊन संपेल की वाढेल असे प्रश्न जनतेला पडू लागले आहेत. याचदरम्यान राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्य सरकार 1 जूनपासून काही गोष्टींवरील निर्बंध मागे घेण्याच्या तयारीत असल्याचं संकेत विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर शिथिल होण्याची शक्यता असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. त्यामुळे राज्यात सध्या 14 जिल्हे रेड झोनमध्ये असून रुग्णांचा आकडा बघून लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

येत्या 5 ते 6 दिवसात राज्यात काय परिस्थिती असेल याचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. तसेच रेड झोन असलेल्या जिल्ह्यातल्या कोरोना स्थितीचा आठवड्याभरात आढावा घेण्यात येईल. त्यानंतर जिल्हानिहाय त्यासंदर्भातले निर्णय घेण्यात येतील. रेड झोनमधल्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला नाही तर कडक लॉकडाऊन कायम राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.