शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या बंगल्यावर ईडीचा छापा
बातमी मुंबई

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या बंगल्यावर ईडीचा छापा

लोणावळा : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक ईडीच्या रडारवर असून, त्यांच्या लोणावळा येथील बंगल्यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. ईडीचे अधिकारी सरनाईक यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत, अशी अधिकृत माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. टॉप्स ग्रुप(सिक्युरीटी) कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहारांबाबत ईडीकडून चौकशी केली जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ईडीने नोव्हेंबर २०२०मध्ये बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्यानंतर सरनाईक यांच्यासह त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांची चौकशी ईडीकडून करण्यात आली होती. ईडीने टॉप्स ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात २५ नोव्हेंबरला अमित चांदोळे यांचीही चौकशी केली होती. त्यानंतर अमित चांदोळे यांना अटकही करण्यात आली होती. अमित चांदोळे हे प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार आहेत.

धाडी आणि चौकशीनंतर यावरून राज्यात बरंच राजकारण पेटलं होतं. मात्र, नंतर या प्रकरणाची चर्चा थंडावली होती. त्यानंतर आज अचानक ईडीचे अधिकार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील बंगल्यावर दाखल झाले. संबंधित अधिकारी बाहेरील सीसीटीव्ही चेक करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अद्याप, बंगल्यात ईडीच्या अधिकाऱ्यांनी एन्ट्री केली नसल्याचं सांगण्यात येत आहे. अधिकारी कधी आले आहेत हे मात्र समजू शकले नाही.