उत्तर महाराष्ट् बातमी

एकनाथ खडसेंना वाढीव बिलाचा शॉक; एका महिन्यात आलंय एवढं बिल

जळगाव : राज्यात सध्या वाढीव वीज बिलामुळे नागरिक त्रस्त आहेत. अशात भाजपनेते एकनाथ खडसे यांनाही वाढीव वीज बीलाचा शॉक बसला आहे. एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरातील घराचे वीजबिल भरमसाठ आले आहे. लॉकडाऊन काळात एकनाथ खडसे यांना 1 लाख चार हजाराचे बिल आल्याने, त्यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

लॉकडाऊन काळात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून वाढीव बिलं येत आहेत. सर्वसामान्य नागरिक हैराण आहेत. महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचे बिल अवास्तव आहे, ते न भरण्यासारखे आहे, असं खडसे म्हणाले. नागरिकांना येत असलेल्या अवास्तव बिलामध्ये सवलती, सूट द्या, अवास्तव बिलाच्या तपासण्या करा, अशी मागणी त्यांनी केली.

वीज बिलाच्या तक्रारींचा महापूर आला आहे. सततच्या तक्रारींनी राज्य सरकारचीही डोकेदुखी वाढली आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी जाहीररित्या वाढीव वीजबिलाबाबत रोष व्यक्त केला आहे. यामध्ये खडसेंचाही समावेश झाला असल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.

आशा भोसले यांनाही वाढीव वीज बील
प्रख्यात गायिका आशा भोसले यांनीही नुकतीच वीज बिलाबाबत तक्रार केली आहे. लोणावळ्यातील बंगल्याला दोन लाख आठ हजार रुपयांचे बिल आल्याची तक्रार भोसलेंनी केली आहे. आपल्याला जून महिन्याचे वीज बिल तब्बल 2 लाख 8 हजार 870 रुपये आल्याची तक्रार आशा भोसले यांनी महावितरणकडे केल्याचे सांगण्यात आले होते. लोणावळ्यात असलेल्या आशा भोसले यांच्या बंगल्याचे हे बिल आहे. मात्र हे बिल प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेऊन केल्याचा दावा महावितरणने केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत