राज्यातील ‘या’ १० महापालिकांच्या निवडणुका होणार फेब्रुवारीत
बातमी महाराष्ट्र

राज्यातील ‘या’ १० महापालिकांच्या निवडणुका होणार फेब्रुवारीत

मुंबई : राज्यातील एकूण 10 महानगरपालिकांच्या निवडणूक फेब्रुवारीत नियोजित वेळेतच घेण्याची तयारी सुरू झाली आहे. मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह अन्य १० महानगरपालिका, २० नगरपरिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुका फेब्रुवारीत होणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असल्या, तरी या निवडणुका घेण्यासाठी उच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. विधानसभांच्या निवडणुका होऊ शकतात, तर महानगरपालिकांच्या निवडणुका का घेण्यात येत नाही? असा सवाल या याचिकांमध्ये उपस्थित करण्यात आला आहे.

दरम्यान, आता कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची परिस्थिती बघून ऑक्टोबरमध्ये या निवडणुका घेण्याची तयारी आयोगाने सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.