नवउद्योजकांना मिळणार अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठाची साथ; डॉ. हर्षदीप कांबळे यांची आज विशेष मुलाखत
बातमी महाराष्ट्र

नवउद्योजकांना मिळणार अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठाची साथ; डॉ. हर्षदीप कांबळे यांची आज विशेष मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र कार्यक्रमात ‘नवउद्योजकांना प्रोत्साहन’ या विषयावर महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून उद्या म्हणजेच गुरूवार दिनांक ०४ मार्च २०२१ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या कार्यक्रमातून नवउद्योजकांना मोठे प्रोत्साहन मिळाणार असून निवेदिका शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे. उद्योग संचालनालयाकडून नवउद्योजकांना देण्यात येणा-या आवश्यक सोयी सुविधा, कार्नेल युनिर्व्हसिटी न्युयार्क यांच्यासोबतचा सामंजस्य करार, आतंरराष्ट्रीय विद्यापीठासोबत करार करून इनक्युबेशन केंद्र स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. राज्यात या उपक्रमाची करण्यात येणारी अमंलबजावणी, योजनेसाठीची आर्थिक तरतूद अशा गोष्टी संदर्भात डॉ. हर्षदीप कांबळे जय महाराष्ट्र या कार्यक्रमात माहिती देणार आहेत.

दरम्यान, डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मागील दोन वर्षांच्या प्रयत्नाने, कॉर्नेल विद्यापीठ, अमेरिका यांनी 10 डिसेंबर 2020 रोजी एक सामंजस्य करार केला. अत्याधुनिक सुविधा असलेल्या इंटरनॅशनल बिझनेस इन्क्युबेटर रिलायन्स आयटी पार्क, नवी मुंबई येथे 13,000 स्क्वे. फूट क्षेत्रावर स्थापन करण्याचे मान्य करण्यात आले होते आणि तसा करार करण्यात आला होता.