सोलापुरात सात आमदारांसह दोन खासदार आणि महापौरांवर गुन्हा
पश्चिम महाराष्ट्र बातमी

सोलापुरात सात आमदारांसह दोन खासदार आणि महापौरांवर गुन्हा

सोलापूर : मराठा आरक्षण प्रश्नावर पोलिसांची परवानगी धुडकावून रविवारी बेकायदा मराठा आक्रोश मोर्चा काढल्याप्रकरणी सात आमदार, दोन खासदार आणि महापौरांसह ४६ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींसह अन्य कलमे लावण्यात आली आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मराठा आक्रोश मोर्चाचे प्रमुख आयोजक किरण शंकर पवार (रा. जुनी पोलीस लाईन, मुरारजी पेठ, सोलापूर) व राम अनिल जाधव (रा. राघवेंद्रनगर, मुरारजी पेठ, सोलापूर) आणि मोर्चाचे नेतृत्व केलेले आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासह सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, विजय देशमुख, राजेंद्र राऊत, प्रशांत परिचारक, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते व आमदार समाधान अवताडे यांच्या विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

याशिवाय महापौर श्रीकांचना यन्नम व पालिका सभागृहनेते शिवानंद पाटील, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, नगरसेवक अमर पुदाले, नागेश भोगडे, विनायक विटकर, संतोष भोसले, भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, विजयकुमार डोंगरे, राजू सुपाते, बिज्जू प्रधाने, मतीन बागवान, अमीर यासीन मुलाणी, मोहन डांगरे, निखील भोसले यांनाही आरोपी करण्यात आले आहे.