आमदार वैभव नाईकांसह ४० जणांवर गुन्हे दाखल
कोकण बातमी

आमदार वैभव नाईकांसह ४० जणांवर गुन्हे दाखल

सावंतवाडी : कुडाळ येथे शनिवारी शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या खडाजंगी प्रकरणी आमदार वैभव नाईक यांच्यासह ४० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कुडाळ येथे शनिवारी सकाळी आमदार वैभव नाईक व त्याचे कार्यकर्ते भारत पेट्रोल पंपावर आल्यानंतर भाजप सेना कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे वातावरण तंग झाले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जमावबंदीचे उल्लंघन केले. याप्रकरणी सेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह सेना भाजपच्या ४० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली आहे.

शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून कुडाळ शहराच्या मध्यवर्ती असलेल्या पेट्रोल पंपावर १०० रुपयांत प्रति वाहन दोन लिटर पेट्रोल तर भाजप सदस्यांचे ओळखपत्र दाखवणाऱ्याला १ लिटर मोफत पेट्रोल देणार असल्याचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी जाहीर केले होते. त्यानंतर शिवसेना भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राडा करण्याचा प्रयत्न झाला होता.