दिलासादायक ! पुण्यात कोरोनाबाबत मार्चनंतर पहिल्यांदाच घडलं असं काही
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! पुण्यात कोरोनाबाबत मार्चनंतर पहिल्यांदाच घडलं असं काही

पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरवात झाल्यापासून पहिल्यांदाच पुण्याने कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु केली असून आज पुणे कंटेन्मेंट झोनमुक्त झालं आहे. शहरात आता एकही कंटेन्मेंट झोन उरलेला नसून मार्च महिन्यानंतर प्रथमच असं घडलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला होता. दुबई येथून परतलेल्या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. नंतर मुंबईसह राज्यात सर्वत्र कोरोना संसर्ग पसरला. सुरुवातीला मुंबई हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. मात्र, नंतर राज्यातील कोरोना साथीचा केंद्रबिंदू पुण्याकडे सरकला. पुण्यातील मृत्यूदरही मोठा असल्याने चिंता अधिकच वाढली होती. मात्र, आरोग्य यंत्रणांचे अथक प्रयत्न, पालिका व शासनाने उपलब्ध केलेल्या आरोग्य सुविधा यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुकारलेल्या लढ्याला बळ मिळत गेलं.

पुणे महापालिका हद्दीत आता एकही कंटेन्मेंट झोन नसून पुणे कंटेन्मेंट झोनमुक्त शहर बनलं आहे, असे पालिकेकडून सांगण्यात आले. दरम्यान, डिसेंबरच्या सुरुवातीला पुण्यात ६ कंटेन्मेंट झोनची घोषणा करण्यात आली होती. त्याआधी नोव्हेंबरमध्ये ही संख्या १३ होती तर ऑक्टोबरमध्ये पुण्यात ३३ कंटेन्मेंट झोन होते. त्याआधी करोना साथीने थैमान घातले असताना कंटेन्मेंट झोनची संख्या १०० पर्यंत गेली होती.