अपघातांची मालिका सुरुच; पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर पाच वाहनांची धडक, पाच ठार
बातमी मुंबई

अपघातांची मालिका सुरुच; पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर पाच वाहनांची धडक, पाच ठार

पुणे : राज्यातील अपघातांची मालिका सुरुच असून पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवर ५ वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात ५ जण ठार झाले आहेत. वाहनांनी एकमेकांना धडक बसून हा अपघात झाला आहे. अपघाता पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका पाच वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. पुण्याकडुन मुंबईच्या दिशेने जात असताना बोरघाट उतरताना फुडमॉलजवळ हा अपघात झाला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कंटेनरने इतर चार वाहनांना मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. कंटेनरने ट्रक, टेम्पो आणि दोन कारना मागून धडक दिली. अपघातात झुंझारे कुटुंबाचा मृत्यू झाला आहे. हे कुटुंब नवी मुंबईत वास्तव्यास होतं. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोन जखमींना अष्टविनायक (पनवेल) व अन्य दोघांना वाशी येथे मनपा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर एका जखमी इतर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मृतांची नावं –
१) मंजू प्रकाश नाहर (५८),
२) डॉ. वैभव वसंत झुंझारे, (४१)
३) उषा वसंत झुंझारे (६३)
४) वैशाली वैभव झुंझारे (३८)
५) श्रिया वैभव झुंझारे (५)

जखमींची नावं –
१) स्वप्नील सोनाजी कांबळे (३०)
२) प्रकाश हेमराज नाहर (६५)
३) अर्णव वैभव झुंझारे (११)
४) किशन चौधरी (गंभीर जखमी)
५) काळूराम जमनाजी जाट (गंभीर जखमी)

अपघातग्रस्त वाहनं –
कंटेनर RJ. 51.GB.2238
इनोव्हा Mh.12. LX. 4599
क्रेटा Mh. 47.AD.4025
टेम्पो MH. 14.GD.3880
ट्रक MH. 14.P.6870