मध्यप्रदेशात एकाच दलित कुटुंबातील पाच जणांची हत्या
देश बातमी

मध्यप्रदेशात एकाच दलित कुटुंबातील पाच जणांची हत्या

भोपाळ : मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यातील नेमवार येथे एकाच दलित कुटुंबातील पाच जणांची हत्या करून आरोपीने त्यांचे मृतदेह स्वत:च्याच मालकीच्या शेतात पुरण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या पाचही जणांचे पुरलेले मृतदेह उकरून बाहेर काढण्यात आले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या कुटुंबाला अनुसूचित जाती/जमाती कायद्यान्वये ४० लाख रुपये नुकसान भरपाई जाहीर केली आहे. या प्रकरणाची सुनावणी शीघ्रगती न्यायालयात होईल, असे चौहान यांनी जाहीर केले असून विरोधी पक्षनेते कमलनाथ यांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. या दलित कुटुंबातील हे पाचही जण १३ मेपासून बेपत्ता झाले होते.

मृतांची नावे रूपाली कास्ते, ममताबाई कास्ते, दिव्या कास्ते, त्यांचे चुलते पूजा ओसवाल आणि पवन ओसवाल अशी आहेत. आरोपीचे नाव सुरेंद्रसिंह चौहान असे असून त्याने अन्य सहा जणांच्या मदतीने रूपाली आणि तिच्या कुटुंबीयांची हत्या केली. पोलिसांनी सुरेद्रसिंह याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने पाच जणांची हत्या करून स्वत:च्याच शेतात आठ फूट खोल खड्ड्यात त्यांचे मृतदेह पुरल्याचे उघड झाले.