अमेरिकेत इडा चक्रिवादळाचा हाहाकार; ४४ जणांचा मृत्यू
बातमी विदेश

अमेरिकेत इडा चक्रिवादळाचा हाहाकार; ४४ जणांचा मृत्यू

न्यूयॉर्क : अमेरिकेत इडा चक्रिवादळाने हाहाकार माजवला असून गुरुवारी एका रात्रीत एकट्या न्यूयॉर्कमध्ये तब्बल ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण हे स्वतःच्याच तळघरात कैद झाले होते आणि तिथेच पुरामुळे त्यांचा मृत्यू झाला. वादळामुळे अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये विक्रमी पाऊस झाला आहे. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं असून सर्वत्र पाणी साचल्याने सबवे सेवा बंद झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

न्यूयॉर्कमधील परिस्थिती तर इतकी भीषण आहे की, महापौर बिल दि ब्लासिओ यांनी एका रात्रीसाठी आणीबाणी घोषित केली होती. मी ५० वर्षांचा आहे आणि मी इतका पाऊस कधीच पाहिला नाही. हे जंगलात राहत असल्यासारखं होतं, अगदी उष्ण कटीबंधीय पावसाप्रमाणे. हा पाऊस, पूर सगळं खूप विचित्र असून अविश्वसनीय आहे, असं मेटोडिजा मिहाजलोव एपीएफशी बोलताना म्हणाले. त्यांचे मॅनहॅटनमध्ये रेस्टॉरंट असून त्याचे तळघर तीन इंच पाण्याने भरले होते.

इडा चक्रीवादळामुळे ईशान्य अमेरिकेला मोठा फटका बसला आहे. वादळामुळे अनेक उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. ला गार्डिया आणि जेएफके विमानतळ तसेच नेवार्क विमानतळावरून शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. आम्ही सगळे या पूरपरिस्थितीत सोबत आहोत. देशातील लोक एकमेकांना करण्यास तयार आहे, असं अध्यक्ष जो बायडेन शुक्रवारी दक्षिणेकडील लुईझियाना राज्याच्या दौऱ्यापूर्वी म्हणाले. लुईझियाना राज्याला इडा चक्रिवादळाचा मोठा फटका बसला असून तिथं अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत.