जेवणात वाढले नाही माशाचे डोके; लग्नाच्या मांडवात तुफान हाणामारी, ११ जण गंभीर जखमी
देश बातमी

जेवणात वाढले नाही माशाचे डोके; लग्नाच्या मांडवात तुफान हाणामारी, ११ जण गंभीर जखमी

पटना : जेवणात माशाचे डोके वाढले नाही म्हणून लग्नाच्या मांडवात तुफान हाणामारी झाल्याची घटना बिहारमधील गोपाळगंजमध्ये घडली आहे. दरम्यान त्यांच्यात तुफान हाणामारी झाली. यामध्ये ११ लोकं गंभीर देखील झाले. जेवणात आवडता पिस माशाचे डोके न भेटल्याने ही हाणामारी झाली. ही घटना सिसई टोला भटवालिया गावची आहे. जेवणात माशाचा आवडता पिस न भेटल्याने वऱ्हाडी आणि घरातील लोकांमध्ये आधी शाब्दिक वाद झाले. त्यानंतर हा वाद एका माशाचा पिससाठी विकोपाला गेला. याठिकाणी थेट हाणामारी सुरु झाली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हाणामारीत दोन्ही बाजूचे ११लोक गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांना उपचारासाठी सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गावात राहणाऱ्या छठू गोंड नावाच्या व्यक्तीच्या मुलीचे लग्न होते. नरकटिया गावातून आलेल्या वऱ्हाड्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. पण जशी जेवणाची वेळ आली तसा स्वागत समारंभाचा हाणामारीने निरोप समारंभ झाला. वऱ्हाड्यांना जेवणात मासे आणि भात देण्यात आला होता. त्याचवेळी काही वऱ्हाडी फिश हेड वाढण्याची मागणी करत होते. मात्र, फिश हेड संपल्यामुळे त्यांना वाढता आले नाही. त्यामुळे वऱ्हाडी चांगलेच संतापले. सुरुवातीला त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत वाद-विवाद झाले. त्यानंतर लवकरच हा वाद-विवाद हाणामारीत बदलला.

लग्नाच्या कार्यक्रमात खुर्च्या फेकल्या जाऊ लागल्या. या हिंसक हाणामारीत ११ लोक जखमी झाले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्रत्येकाची वेगवेगळी विधाने नोंदविली. हथुआ उपविभागीय अधिकारी नरेश कुमार म्हणाले की, दोन्ही बाजूंकडून चौकशी केली जात आहे.