लातूरच्या माजी खासदारांना राष्ट्रीय समाज सेवा रत्न पुरस्कार जाहीर
बातमी मराठवाडा

लातूरच्या माजी खासदारांना राष्ट्रीय समाज सेवा रत्न पुरस्कार जाहीर

लातूर : लातूरचे माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना सन 2021चा राष्ट्रीय समाज सेवा रत्न पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. मध्यप्रदेश भोपाळ येथील द ग्लोबल ह्युमन राईट्स फाउंडेशन आणि नॅशनल अंटी हराशमेंट फाउंडेशन यांच्या वतीने ग्लोबल स्तरावरील 2021चा हा पुरस्कार डॉ. गायकवाड यांना जाहीर झाल्याचे पत्र त्यांना नुकतेच मिळाले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

संस्थेचे अध्यक्ष रवी के एस नारायण आणि एन ए एच चे डायरेक्टर जनरल विकास महाजन यांनी पत्राद्वारे कळवले आहे. यावर्षीचा राष्ट्रीय समाज सेवा रत्न-2021चा पुरस्कार वितरण सोहळा हा कार्यक्रम कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुरस्काराचा मोमेंटो प्रमाणपत्र हे 10 मे 2021 रोजीच पुरस्कार मिळालेल्यांना कुरिअरद्वारे दिले जाणार असल्याचेही या पत्राद्वारे कळवण्यात आले आहे.

समाजासाठी विशेष काम करणाऱ्या आणि लोकोपयोगी योजना राबवण्यात प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या देशातील मान्यवरांना हा पुरस्कार दिला जातो. डॉ. गायकवाड हे खासदार असताना अनेक योजना लातूर लोकसभा मतदार संघात राबवल्या त्याबद्दल हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

दरम्यान, प्राध्यापक डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना नुकताच डॉ. बी. आर. आंबेडकर इंटरनॅशनल अवॉर्ड ही 8 मेला नेपाळ लुंबिणीला मिळणार आहे. हा यावर्षीचा याच आठवड्यात जाहीर झालेला दुसरा ग्लोबल अवॉर्ड आहे. त्याबद्दल डॉ सुनील बळीराम गायकवाड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.