येस बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांना अटक
देश बातमी

येस बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांना अटक

मुंबई : मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी येस बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांना अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) अटक केली आहे. हे प्रकरण एचडीआयएल आणि मॅक स्टार मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित आहे. राणा कपूर यांना आज ईडीने विशेष पीएमएलए कोर्टात हजर केले. कोर्टाने त्यांना 30 जानेवारीपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मनी लाँडरिंग (आर्थिक गैरव्यवहार) केल्याच्या आरोपात त्यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येस बँकेतील घोटाळा समोर आल्यानंतर ईडीनं शुक्रवारी राणा कपूर यांच्या घरावर आणि संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी कपूर यांची तब्बल ३० तास चौकशी केली. या कारवाईनंतर राणा कपूर यांना चौकशी ईडीनं ताब्यात घेतलं. शनिवारी दिवसभर यंत्रणांनी त्यांची चौकशी केली. या चौकशीनंतर शनिवारी मध्यरात्री कपूर यांना अटक करण्यात आली.

आर्थिक संकटात असलेल्या येस बँकेने आर्थिकदृष्टय़ा सक्षम पुर्नउभारी घेण्याबाबतचा विश्वासार्ह आराखडा सादर न केल्याने बँकेविरुद्ध आरबीआयने कारवाई केली होती. या कारवाईमुळे अर्थविश्वात खळबळ उडाली. दरम्यान, राणा कपूर यांना ईडीने गेल्या वर्षी मार्चमध्ये अटक केली होती. आता त्यांना आणखी एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. कपूर, त्यांची पत्नी आणि त्यांच्या तीन मुलींविरूद्ध डीएचएफएलशी संबंधित कंपनीकडून 600 कोटी रुपये घेतल्याबद्दल ईडी चौकशी करत आहे.

दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडशी (डीएचएफएल) संबधित असलेल्या नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपनीकडून (एनबीएफसी) कपूर कुटुंबाशी सबंधित असलेल्या डूइट अर्बन व्हेंचर प्राईव्हेट लिमिटेड कर्ज देण्यात आलं होतं. या प्रकरणी यावेळी ६०० कोटी रूपयांच्या कर्जप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली.