कोकणातील माजी आमदाराचे वाढदिवसादिवशीच निधन
कोकण बातमी

कोकणातील माजी आमदाराचे वाढदिवसादिवशीच निधन

अलिबाग : काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं त्यांच्या वाढदिवसादिवशीच निधन झालं आहे. अलिबाग उरण मतदारसंघाचे माजी आमदार असणारे मधुकर ठाकूर यांनी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. ते ७४ वर्षांचे होते. १५ जुलै रोजीच त्यांचा वाढदिवस असतो. दुर्दैवाने वाढदिवशीच त्यांची प्राणज्योत मालवली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मधुकर ठाकूर मागील तीन ते चार वर्षांपासून आजारी होते. झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य आणि २००४ ते २००९ या काळात अलिबाग-उरण मतदारसंघाचे ते आमदार होते.

रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. दुपारी २ वाजता अलिबाग तालुक्यातील सातीर्जे या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.