माजी खासदार डॉ.सुनील गायकवाड यांनी आनंदराज आंबेडकरांची घेतली भेट
बातमी मराठवाडा

माजी खासदार डॉ.सुनील गायकवाड यांनी आनंदराज आंबेडकरांची घेतली भेट

औरंगाबाद : लातूरचे माजी खासदार सुनील गायकवाड यांनी पीपल्स एजुकेशन सोसायटीचे चेअरमन तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु आनंदराज यांची भेट घेतली. यावेळी डॉ.सुनील गायकवाड यांनी आनंदराज आंबेडकरांना स्वतःचे आणि लॉ कॉलेजच्या विद्यार्थी यांनी प्रकाशित केलेले “जस्टिस & लॉ “हे मासिक भेट दिले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

औरंगाबाद येथे गुरुवारी डॉ.बी.आर.आंबेडकर लॉ कॉलेज येथे डॉ.गायकवाड यांनी आनंदराज आंबेडकरांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. त्यासोबतच डॉ गायकवाड यांचा लॉ कॉलेज येथील प्रोफेसर आणि कर्मचाऱ्यांनी “हाईरेंज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड” मध्ये १६ व्या लोकसभेतील हाईली एज्यूकेटेड मेम्बर ऑफ पार्लमेंट अशी नोंद झाल्याबद्दल सत्कार केला.