माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांना डी. लीट’ने सन्मानित
बातमी मराठवाडा

माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांना डी. लीट’ने सन्मानित

दिल्ली : लातूरचे माजी खासदार डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना मार्केटिंग मॅनेजमेंट या विषयात डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी. लीट) आणि मॅनेजमेंटमध्ये साइन्स या विषयात डी.एस.सी.( डॉक्टर ऑफ सायन्स) या दोन सर्वोच्च पदव्यांनी सन्मानित करण्यात आले. आज दिल्ली येथील लीला अंबिन्स हॉटेल मध्ये कॉमन वेल्थ वोकेशनल युनिव्हर्सिटी, मकौंगा, किंग्डम ऑफ टोंगा या विद्यापीठा कडून या पदव्या देण्यात आल्या.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मालदीव चे शिक्षण मंत्री डॉ. अब्दुल्ला रशीद अहमद यांच्या शुभ हस्ते आणि सी.बी.एस.ई चे सचिव अनुराग त्रिपाठी यांच्या उपस्थित डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी खासदार डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड हे लातूर चे उच्च शिक्षित लोकप्रतिनिधी म्हणून २०१४-२०१९ मध्ये लोकसभा मध्ये उत्तम कामगीरी केली असून ते अनेक विषयांत पदवीधर आहेत.

डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ मधून मास मीडिया जर्नालिझम च्या बी. एम. सी.जे. आणि एम. ए. एम. सी. जे आणि एम. बी. ए.( मार्केटिंग) पी. एच. डी.(मॅनेजमेंट साइन्स) डिग्री पूर्ण केले आहेत. त्यांच्या या सर्व कामा मुळे त्यांचा या सर्वोच्च पदव्या देऊन आज गौरव करण्यात आला. त्यांच्या अनेक पदव्या मध्ये या दोन पदव्या चा भर पडला आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.

डॉ. सुनिल गायकवाड हे २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या लातूर मतदारसंघातून निवडून लोकसभेवर निवडून गेले होते. लॉर्डबुद्धा अंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार, बांगलादेश या पुरस्काराने गौरवलेले ते एकमेव भारतीय खासदार आहेत. त्यांना सांसद रत्न पुरस्कार तसेच अनेक पुरस्कारानी त्यांचा गौरविण्यात आलेले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते जनसंवाद हे त्यांचे हिन्दी पुस्तक प्रकाशित करण्यात आलेले आहे. ते १६ व्या लोकसभा मधे १००% उपस्थिती आणि सर्वाधिक शैक्षणिक डिग्री असलेले खासदार म्हणूनही परिचित आहेत. भारत सरकारचे दोनवेळा त्यांनी परदेशात प्रतिनिधित्व केले. सुनील गायकवाड यांच्या वडिल बळिराम गायकवाड यांनी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत चळवळीत कामे केलेले आहे.