पंतप्रधान मोदींचं ऑफिस ओएलएक्सवर विक्रीला; पाहा किंमत
देश बातमी

पंतप्रधान मोदींचं ऑफिस ओएलएक्सवर विक्रीला; पाहा किंमत

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय चक्क ओएलएक्सवर विक्रीला टाकत त्याची किंमत ७.५ कोटी रुपये सांगण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून मोदी यांच्या वाराणसीतील कार्यालयाचा फोटो ओएलएक्सवर टाकत त्याची विक्री किंमत ७.५ कोटी रुपये सांगण्यात आली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या जाहिरातीत कार्यालयाच्या आतील माहिती, खोल्या आणि पार्किंगच्या सुविधेबद्दलही सांगण्यात आलं आहे. हे प्रकरण पोलिसांकडे आल्यानंतर ओएलएक्सवरुन मोदींच्या कार्यालय विक्रीची जाहिरात हटविण्यात आली. वाराणसी पोलिसांनी एक व्हिडीओ शेअर करुन या प्रकरणात कारवाई केली आहे. चार जणांना ताब्यात घेतलं आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कार्यालय वाराणसी येथील भेलूपूर पोलीस ठाणे हद्दीतील जवाहर नगर परिसरात आहे.

मोदींच्या या कार्यलयात वाराणसी मतदारसंघातले नागरिक या ठिकाणी त्यांचं म्हणणं मांडत असतात. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीचा दौराही केला होता. तसेच अनेक कार्यक्रमांना त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेही हजेरी लावली होती.