राधानगरी धरणाचे उघडले चार दरवाजे; पुराचा धोका कायम
पश्चिम महाराष्ट्र बातमी

राधानगरी धरणाचे उघडले चार दरवाजे; पुराचा धोका कायम

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने उघडीप घेतल्याने पूरग्रस्त जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. तथापि सायंकाळपासून पावसाची पुन्हा रिपरिप सुरु झाल्याने पुराची धास्ती वाढीस लागली आहे. अद्यापही पंचगंगा नदीचे पाणी धोका पातळीवरून वाहत आहे. अशातच राधानगरी धरणाचे स्वयंचलित चार दरवाजे रविवारी उघडण्यात आले असून, त्यात ७११२ क्युसेस विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोल्हापुर जिल्ह्याला पुराचा धोका अद्यापही कायम आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तीन दिवस अतिवृष्टीमुळे संपूर्ण जिल्हा जलमय नद्या धोका पातळी पेक्षाही अधिक दिशेने वाहू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारपर्यंत थांबलेल्या पावसाने संध्याकाळी पुन्हा अंग काढले. संध्याकाळी पाच वाजल्यानंतर कोल्हापूर शहरात पावसाची रिपरिप सुरू झाली. तर पश्चिमेकडील भागात पावसाला गती आल्याने महापुराची भीती पुन्हा वाढीस लागली आहे.

नदीची पूर पाणीपातळी कमी होऊ लागले असली तरी अद्याप धोका पूर्णपणे टळलेला नाही. पंचगंगा नदी आज सायंकाळी पाच वाजता पाच वाजता पाणी पातळी ५१ फूट होती तर धोका ४३ फूट आहे. अन्य नद्यांच्या ही अशीच अवस्था आहे. त्यामुळे लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले जात आहे. राधानगरी धरण उच्चत्तम पातळीपर्यंत भरले असून, दुपारी दोन तर सायंकाळी दोन असे चार स्वयंचलीत दरवाजे खुले झाले आहेत. एखादा स्वयंचलीत दरवाजा खुला झाला की धरण भरले असे समजले जाते. पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्याने पातळी वाढली व पाठोपाठ दोन दरवाजे खुले झाले.