नगरमध्ये एकाचवेळी २२ जणांना अग्नी; तर दिवसभरात ४२ अत्यंसंस्कार
पश्चिम महाराष्ट्र बातमी

नगरमध्ये एकाचवेळी २२ जणांना अग्नी; तर दिवसभरात ४२ अत्यंसंस्कार

नगर : कोरोना भयानक रुप आता समोर येत असून त्याचा प्रत्यय नगमध्ये आला. नगरमध्ये एकाचवेळी २२ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून दिवसभरात एकूण ४२ जणांचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील आंबाजोगाईमध्ये एका सरणावर 8 जणांचे अंत्यंसस्कार केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर हा प्रकार अहमदनगरच्या अमरधाममध्ये घडला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विद्युत दाहिनीत दिवसभरात 20 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि २२ जणांवर पारंपारिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. असे मिळून एकूण दिवसभरात तब्बल ४२ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. महापालिकेसमोर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याचं आव्हानं उभं राहिलं होतं. शववाहिनीतून एकाचवेळी सहा मृतदेह भरून अमरधाममध्ये नेण्याची नामुष्कीही महानगरपालिकेवर ओढावली आहे.

अहमदनगरमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन कोरोनामुळे आत्तापर्यंत १२७० जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदनगर जिल्हयात सध्या ११ हजार २३७ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात दररोज 50 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण समोर येत आहेत. गुरुवारी महाराष्ट्रात 56 हजार 286 कोरोना रुग्ण आढळले. महाराष्ट्रातमध्ये कोरोनाची दुसरी लाट असून कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे.