चिंतामणीच्या प्रवेशद्वारावर तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, अध्यक्ष म्हणाले तो चोर होता…
बातमी मुंबई

चिंतामणीच्या प्रवेशद्वारावर तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, अध्यक्ष म्हणाले तो चोर होता…

मुंबई: मुंबईत गेल्या दोन वर्षांनंतर मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. कुठल्याही निर्बंधांशिवाय यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यात येत असल्याने भाविकही आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी तासंतास रांगेत उभे राहात आहेत. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तर दोन दोन दिवस भाविक रांगेत असतात. तर मुंबईतील इतर प्रसिद्ध गणपतींचं दर्शन घेण्यासाठीही ३-४ तासांची प्रतिक्षा भाविकांना पाहावी लागते. मात्र, यादरम्यान एक अत्यंत अप्रिय घटना घडली आहे. मुंबईतील प्रसिद्ध अशा चिंतामणी गणेश मंडळात कार्यकर्त्यांकडून चिंतामणीच्या दर्शनाला आलेल्या गणेश भक्ताला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची माहिती होती. याचा एक व्हिडिओही पुढे आला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चिंचपोकळीचा चिंतामणी गणेशाच्या दर्शनासाठी मुंबई तसेच उपनगरातून अनेक भाविक येत असतात. दोन-दोन तीन-तीन तास गणेश भक्त चिंतामणीच्या दर्शनासाठी रांगेत असतात. अशाच एका भक्ताला गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून एका भाविकाला मारहाण करण्यात आल्याची माहिती होती. गर्दीच्या वेळी चिंतामणीच्या प्रवेशद्वारावर या कार्यकर्त्यांनी भाविकाला जबर मारहाण करताना या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

तो चोर होता – चिंतामणी गणेश मंडळ अध्यक्ष

या मारहाणीवर आता चिंतामणी गणपती मंडळ अध्यक्षांचं स्पष्टीकरण आलं आहे. अज्ञात व्यक्तीने महिलांच्या गळ्यातील चैनवर हात टाकला, या चैन चोरणाऱ्या अज्ञात व्यक्तीला मारहाण झाली आहे. तो भाविक नाही. आमच्या कार्यकर्त्यांनी कुणालाही मारहाण केली नाही. त्या चोराला पदाधिकाऱ्यांनी चोप दिला असं अध्यक्षांनी सांगितलं आहे.