राम मंदिरासाठी या क्रिकेटरने दिली १ कोटीची देणगी
देश बातमी

राम मंदिरासाठी या क्रिकेटरने दिली १ कोटीची देणगी

नवी दिल्ली : राम मंदिराच्या उभारणीसाठी भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीरने १ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. जुना वाद आता संपला आहे. त्यामुळे आता देशात एकता आणि शांतता प्रस्थापित होईल. मंदिराच्या उभारणीसाठी मी आणि माझ्या कुटुंबांनं एक छोटीशी देणगी दिली आहे, असं गौतम गंभीर म्हणाला आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातून निधी गोळा करण्याचे अभियान सुरू झाल्यानंतर गौतम गंभीरने देणगी देण्याचा निर्णय घेत देणगी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने राम मदिंराच्या उभारणीसाठी देणगी गोळा करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, बिहारचे राज्यपाल फागू चौहान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक दिग्गजांनी देणगी दिली आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमीपूजन करण्यात आले होते. त्यानंतर आता गेल्या काही दिवसांपूर्वी राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषदेने या वर्गणी अभियानाला सुरुवात केली आहे. अयोध्येत भव्य राम मंदिर व्हावे, अशी सर्व भारतीयांची इच्छा असल्याचं सांगत गौतम गंभीरने आपल्या परिवारातर्फे एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे.