गौतम गंभीरला मोठा धक्का; कारवाई करण्याची न्यायालयात मागणी
देश बातमी

गौतम गंभीरला मोठा धक्का; कारवाई करण्याची न्यायालयात मागणी

मुंबई : माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या अडचणीत वाढ झाली असून गंभीरने कोरोनाच्या औषधांची साठेबाजी केली आणि त्याचं वितरण केल्याचं दिल्ली सरकारच्या ड्रग्स कन्ट्रोलरनी गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितलं. तसंच गौतम गंभीरवर कारवाई करण्याच यावी, अशी मागणीही ड्रग्स कन्ट्रोलरनी न्यायालयात केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दिल्ली सरकारच्या ड्रग्स कन्ट्रोलरनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितलं की, ‘गौतम गंभीर फाऊंडेशनने कोरोना रुग्णांसाठी वापरलं जाणारं फॅबिफ्लू औषधाची अनधिकृतरित्या साठेबाजी केली. गौतम गंभीर औषधाच्या खरेदी आणि वितरणामध्ये दोषी आढळला आहे. फाऊंडेशन आणि औषधांच्या डिलरवर वेळ न दवडता कारवाई करण्यात यावी, असंही ड्रग्स कन्ट्रोलरने दिल्ली न्यायालयात सांगितलं. न्यायालयाने ड्रग्स कन्ट्रोलरला ६ आठवड्यांमध्ये अशाच प्रकरणांच्या स्थितीचा रिपोर्ट द्यायला सांगितला आहे. याची पुढची सुनावणी आता 29 जुलैला होणार आहे.

दिल्ली न्यायालयातली ही सुनावणी संपल्यानंतर गौतम गंभीर याने भगतसिंग यांचं विधान ट्वीट केलं आहे. मी काहीही चूक केलेली नाही, जनतेच्या भल्यासाठी मी जे करू शकतो ते मी केलं आहे, असं गंभीर म्हणाला. ‘मी एक माणूस आहे, माणसाला जे प्रभावित करतं, ते मला चिंतेत टाकतं- सरदार भगत सिंग’ असं ट्वीट गंभीरने केलं.