गोमांसाच्या तुटवड्यामुळे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची वाढली चिंता; तर उत्तरप्रदेशात…
देश बातमी

गोमांसाच्या तुटवड्यामुळे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची वाढली चिंता; तर उत्तरप्रदेशात…

पणजी : नाताळ सणाला काहीच दिवस उरले असताना गोव्यात गोमांसाचा तुटवडा जाणवू लागला आहे. याबाबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. ”गोमांसाचा पुरवठा वाढेल कसा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. गोवा राज्यात गोमांसाची कमतरता असल्याची जाणीव आम्हाला असून ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही लवकरच पावले उचलू, असे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हंटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गोव्यात नाताळ आणि नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. या दिवसांमध्ये गोव्यात गोमांसाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र या दिवसांमध्ये भाजपचे राज्य असलेल्या गोव्यात गोमांसाचा तुटवडा जाणवत आहे. नाताळ आणि नव्या वर्षाच्या स्वागताच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर गोमांसाची मागणी वाढलेली आहे. खरे तर कर्नाटकात गोमांसाची कमतरता निर्माण झाल्यामुळे गोव्यात देखील गोमांसाचा तुडवडा जाणवत असल्याची माहिती मांस विक्रेत्यांनी दिली आहे. त्यामुळे ऐन सण, उत्सव आणि नव्या वर्षाच्या आगमनाच्या दिवसांमध्ये गोमांसाचा तुटवडा असल्याची जाणीव गोवा सरकारला असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे.

सण- उत्सवाच्याच दिवसांमध्ये गोव्यात जाणवणाऱ्या बीफस तुटवड्याची सरकारलाही कल्पना असून, यावर तोडगा काढण्यासाठी म्हणून लवकरच मार्ग शोधू. तसेच, राज्यात बीफस उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर, या संदर्भात आपण पशुपालन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा तुटवडा भरून काढण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असेही सावंत यांनी म्हंटले आहे.

एकीकडे, भाजपाशाषित गोवा राज्यात गोमांसाचा तुटवडा जाणवत आहे. तर दुसरीकडे उत्तरप्रदेशात उत्तर प्रदेश सरकारने गोहत्या बंदी कायदा आणखी कठोर केला आहे. आता गोहत्यासाठी 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. गोवंशाचे शारीरिक नुकसान केल्यास 1 ते 7 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय गोहत्या आणि गाय तस्करीशी संबंधित गुन्हेगारांची छायाचित्रेही सार्वजनिकपणे पोस्ट केले जातील. युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर प्रदेश शासन प्रतिबंधक (दुरुस्ती) अध्यादेश, २०२० च्या मसुद्यालाही मान्यता देण्यात आली.

गोवा आणि युपी या दोन्ही राज्यात भाजपाचे सरकार आहे. मात्र एकीकडे गोमांसाच्या तुटवड्यामुळे मुख्यमंत्री चिंतेत आहेत. तर दुसरीकडे गोहत्या थांबविण्यासाठी कायदे केले जात आहेत. यामुळे सोशल मिडियावर मुख्यमंत्री सावंत यांना नेटकऱ्यांंनी ट्रोल करायला सुरवात केली आहे. दोन्ही राज्ये भाजपासाशित असूनही दोन्हीकडे वेगळे नियम असल्याने नेटकरी प्रचंड ट्रोल करत आहेत.