गोव्यात गांजाच्या लागवडीसाठी प्रस्ताव; मुख्यमंत्री म्हणतात…
देश बातमी

गोव्यात गांजाच्या लागवडीसाठी प्रस्ताव; मुख्यमंत्री म्हणतात…

पणजी : औषधी वापरासाठी गोव्यात गांजा लागवडीचा प्रस्ताव सरकारकडे आला आहे. या प्रस्तावावरुन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी, औषधी वापरासाठी राज्यात गांजा लागवडीचा प्रस्ताव सरकारकडे आला आहे. पण, या प्रस्तावाला परवानगी देण्याचा विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या प्रस्तावावरून विरोधी पक्षांकडूनही टीकेचा भडीमार सुरू झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दोन दिवसांपूर्वी गोव्याचे कायदा मंत्री निलेश काब्राल यांनी माध्यमांशी बोलताना, आमच्या विभागाने राज्यात औषधी वापरासाठी गांजा लागवडीच्या प्रस्तावाला परवानगी दिली असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर विरोधकांकडून जोरदार टीकेला सुरूवात झाली. अखेर सावंत यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं असून राज्यात औषधी वनस्पती म्हणून गांजाची लागवड करण्याच्या प्रस्तावाला परवानगी देण्याचा विचार नसल्याचं स्पष्ट केलं. काही घटकांनी या विषयावर अनावश्यक वाद निर्माण केला, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

गांजा लागवडीच्या प्रस्तावाबाबत गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाईंनी सरकारवर प्रखर शब्दात टीका केली होती. तर, काँग्रेसनेही सरकारला लक्ष्य केलं होतं. तसंच मंत्री मायकल लोबोंनीही गांजा लागवडीच्या प्रस्तावाला विरोध करताना कोणत्याही परिस्थितीत हा प्रस्ताव मंजूर करु देणार नसल्याचं सांगितलं होतं.