गोव्यात परिस्थिती हाताबाहेर! चार दिवसांत तब्बल एवढे मृत्यू
देश बातमी

गोव्यात परिस्थिती हाताबाहेर! चार दिवसांत तब्बल एवढे मृत्यू

पणजी : गोव्यात परिस्थिती कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असून हाताबाहेर गेल्याचं चित्र आहे. पणजी येथील गोवा मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलमध्ये १५ रुग्णांच्या मृत्यूमुळे खळबळ माजली असतानाच शुक्रवारी आणखी १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोविड वॉर्डमध्ये मध्यरात्री २ ते पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास ऑक्सिजनची पातळी खालावल्याने १३ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ऑक्सिजनचा पुरेसा साठा नसल्याने गोव्यातील या रुग्णालयात गेल्या चार दिवसांत ७४ लोकांनी आपला जीव गमावला असून प्रशासन मात्र रुग्ण मोजणीसंदर्भातील गोंधळ असल्याचा दावा करत आरोप-प्रत्यारोप करत आहे. गोव्यातील या रुग्णालयात मंगळवारी रात्रीपासून परिस्थिती भीषण झाल्याचं चित्र आहे. मंगळवारी २६, बुधवारी २० आणि गुरुवारी १५ रुग्णांनी आपला जीव गमावला. विशेष म्हणजे गोवा मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल हे राज्यातील सर्वात मोठं कोविड रुग्णालय आहे.

तीन दिवसांत समिती चौकशी करणार
राज्य सरकारने गोव्यातील सर्वात मोठ्या रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्यावरुन सुरु असलेल्या या गोंधळ प्रकरणी समिती नेमली आहे. तीन सदस्यीय समिती चौकशी करणार असून तीन दिवसांत रिपोर्ट सादर केला जाणार आहे. यासोबतच रुग्णालयाला योग्य आणि सुरळीत ऑक्सिजन पुरवठा व्हावा यासाठी काही शिफारशीही केल्या जाणार आहेत.