सोन्याच्या दरात घसरण; पुन्हा झाले स्वस्त
देश बातमी

सोन्याच्या दरात घसरण; पुन्हा झाले स्वस्त

मुंबई : नफावसुली आणि भांडवली बाजारातील तेजीचा फटका सोने आणि चांदीला बसत आहे. आजही सोन्याचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही धातूंच्या किमतीत सलग तिसऱ्या सत्रात घसरण झाली. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ४७१०७ रुपये आहे. त्यात ७३ रुपयांची घसरण झाली आहे. बुधवारी सोने २५० रुपयांनी स्वस्त झाले होते. एक किलो चांदीचा भाव ६३८४९ रुपये आहे. त्यात २६९ रुपयांची घसरण झाली आहे. काल चांदी ३०० रुपयांनी स्वस्त झाली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

Goodreturns या वेबसाईटनुसार मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६४८० रुपये इतका आहे. २४ कॅरेटचा भाव ४७४८० रुपये झाला आहे. आज दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६४९० रुपये इतका झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५०६९० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४५६० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८६१० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६८४० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९५४० रुपये आहे.

कमॉडिटी बाजारात सोने अजून विक्रमी पातळीच्या तुलनेत ९००० रुपयांनी स्वस्त आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचा भाव ५६२०० रुपयांपर्यंत वाढला होता. चांदीमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत प्रचंड घसरण झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये चांदीचा भाव ७७८४० रुपयांच्या विक्रमी स्तरावर गेला होता. त्यात जवळपास १७००० रुपयांची घसरण झाली आहे.