सोने-चांदीचे दर पुन्हा घसरले; जाणून घ्या आजचे भाव
देश बातमी

सोने-चांदीचे दर पुन्हा घसरले; जाणून घ्या आजचे भाव

नवी दिल्ली : सोने-चांदीच्या भावात सातत्याने घसरण होताना दिसत आहे. गेल्या वर्षीपासून सुरु असलेल्या कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सोनाच्या आणि चांदीच्या भावामध्ये उच्चांक आणि नीचांक दोन्ही बघायला मिळाले. २२ ग्रॅम कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत आज ४१० रुपयांनी घसरून ४६,९९० रुपये झाली. मागील ट्रेडमध्ये, मौल्यवान धातूची किंमत ४६,४०० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६४ हजार २०० रुपये प्रति किलोने विकली जाईल. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे संपूर्ण भारतात सोन्याच्या दागिने किंमतीमध्ये बदल दिसून येतो. २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ४६ हजार ९९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४६ हजार ९९० रुपये झाला आहे तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४५ हजार ९९० एवढा झाला आहे.

पुण्यामध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४८ हजार ७३० प्रति १० ग्रॅम आहे तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४५ हजार २८० रुपये इतका आहे. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४६,९९० रुपये आहे आणि २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४५,९९० रुपये एवढा आहे. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४८ हजार ७३० आहे व २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४५हजार २८० रुपये एवढा आहे.

गुडरिटर्न्स या वेबसाईटनुसार मुंबईतील चांदीचा दर १० ग्रॅमसाठी ६४२ रुपये आहे. पुण्यासाठी १० ग्रॅमसाठी दर ६४२ रुपये असा आहे. नागपूर आणि नाशिकमध्येही चांदीचा दर हा १० ग्रॅमसाठी ६४२ रुपये आहे.