सोने-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा आजचे दर
देश बातमी

सोने-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा आजचे दर

नवी दिल्ली : सोने-चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. दोन दिवसांच्या तेजीनंतर पुन्हा एकदा सोने चांदीचे दर घसरले आहेत. आज झालेल्या घसरणीनंतरही सोन्याचे दर 46 हजार रुपये प्रति तोळापेक्षा जास्त आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चांदीच्या किंमतीत देखील आज घसरण पाहायला मिळाली असून चांदीचे दर 62 हजार रुपये प्रति किलोग्रॅमपेक्षा जास्त आहेत. आधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 46 हजार 480 रुपये प्रति तोळा होते. तर चांदीचे दर 62 हजार 417 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे दर वाढले असून चांदीचे दर स्थिर आहेत.

दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या दरात 152 रुपये प्रति तोळाची घसरण पाहायला मिळाली. या घसरणीनंतर 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे दर 46,328 रुपये प्रति तोळावर आहेत. अर्थात घसरण होऊनही दर 46 हजारांपेक्षा जास्तच आहेत. भारतीय सराफा बाजारांपेक्षा उलट परिस्थिती आंतरराष्ट्रीय बाजारात आहे. याठिकाणी सोन्याचे दर वधारले असून दर 1,787 डॉलर प्रति औंसवर आहेत.