सोने महिन्यातील निच्चांकी दरावर; जाणून घ्या आजचे दर
देश बातमी

सोने महिन्यातील निच्चांकी दरावर; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४५,२४० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४५,२४० रुपये प्रति १० ग्रॅमवरवरच ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ५९,९०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,२४० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर कमी झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४६,२४० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४४,४४० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,५८० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,२४० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,२४० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५९९ रुपये आहे. कालच्या आणि आजच्या दरामध्ये काहीच फरक नाही. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याचे दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलत असतात. या महिन्यातील हा सर्वात निच्चांकी दर असल्याचे सांगण्यात येत आहे.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.