पुणे बातमी

अण्णा भाऊंच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार – डॉ. प्रशांत नारनवरे

नेलें : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मभूमीत त्यांच्या नावाला शोभेल असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्व सुविधांनी युक्त असे स्मारक बांधण्यासाठी ग्रामपंचायतीने व प्रामस्थांनी स्मारकाचा आराखडा तयार करून द्यावा. त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देऊ, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यानी केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

वाटेगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्म भूमीमध्ये प्राथमिक चर्चा करण्यासाठी वाटेगाव येथे भेट देण्यासाठी नारनवरे आले होते. यावेळी ते म्हणाले, “अण्णा भाऊ च्या स्मारकात सुसन ग्रंथालय, अभ्यासिका, कौशल्य विकास प्रशिक्षण सेंटर, युवकांच्या साठी व्यवसाय मार्गदर्शन केंद्र, वस्तीगृह म्युझियम, स्मारकात अण्णा भाऊ यांचा भव्य पुतळा व स्मारक दैनंदिन कार्यरत रहावे साठी त्याचे व्यवस्थापन स्वतंत्र यंत्रणेमार्फत करण्याची व्यवस्था, असा आराखडा तयार करू. प्रारंभी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. व सध्या असणाऱ्या स्मारकाची, अण्णा भाऊंच्या शिल्पसृष्टीची पाहणी केली. अण्णा भाऊंच्या स्नुषा सावित्री साठे, नातू सचिन साठे यांची भेट घेऊन माहिती

घेतली. या वेळी उपआयुक्त रवींद्र कदम, प्रादेशिक आयुक्त बाळासाहेब सोळंकी, सह आयुक्त समाज कल्याण सांगली जयंत चाचरत, जि. प. चे समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत, प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसीलदार प्रदीप उबाळे, सहायक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार, सरपंच सुरेश साठे, उपसरपंच शुभांगी पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. विनोद जाधव, सुरेश सातवेंकर उपस्थित होते. वाटेगाव (ता. वाळवा) येथे अण्णा भाऊ साठे स्मारकाची पाहणी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published.