ग्रामपंचायत निवडणूक निकाल; जळगावात तृतीयपंथी अंजली पाटील भरघोस मतांनी विजयी
बातमी महाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणूक निकाल; जळगावात तृतीयपंथी अंजली पाटील भरघोस मतांनी विजयी

जळगाव : महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्राने पुरोगामीत्वाचं आणखी एक नवं उदाहरण डोळ्यांसमोर उभं केलं आहे. ते ही ते म्हणजे जळगवाच्या भादली बुद्रूक गावात अंजली पाटील या तृतीयपंथी उमेदवाराला ग्रामपंचायत निवडणुकीत भरघोस मतांनी विजय मिळवून देण्यात आलं आहे. ‘लोकांनी दाखविलेल्या प्रेमामुळेच मी निवडून आले. आता गावातील समस्या जबाबदारीने सोडवून लोकांनी दाखविलेला विश्‍वास सार्थ ठरवेन, असा मानस अंजली पाटील यांनी व्यक्त केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, सुरवातीला अंजली पाटील यांच्या उमेदवारीरून गोंधळ देखील झाला होता. मात्र, हायकोर्टाने त्यांच्या उमेदवारीला मान्यता दिली होती. अंजली पाटील निवडणुक जिंकल्याने त्या आता जळगाव जिल्ह्यातील पहिल्या तृतीयपंथी लोकप्रतिनिधी ठरल्या आहेत. अंजली पाटील यांचा मागील पंचवार्षिक निवडणुकीत ११ मतांनी पराभव झाला होता. यंदाच्या निवडणुकीतही त्यांनी अर्ज भरल्यानंतर ‘लिंग’प्रकारापुढे ‘इतर’असे नमूद केल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज नाकारला गेला.

खंडपीठात धाव घेतल्यानंतर स्त्री संवर्गातून निवडणूक लढविण्यास त्यांना परवानगी मिळाली होती.
तथापि, अंजली या जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वार्ड क्र. चारमधून उभ्या होत्या. त्यांचा ग्रामपंचायत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते विजयापर्यंत प्रचंड संघर्ष बघायला मिळाला. सुरुवातीला त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र, त्यांनी यशस्वी लढा देत उमेदवार अर्ज दाखल केला आणि त्यापुढे जाऊन त्यांनी निवडणूकही जिंकून दाखवली आहे.

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल समोर येत आहे. शिवसेना आणि भाजपात चुरशीची लढत बघायला मिळत आहे. या निवडणुकीत राज्यातील एकमेव तृतीयपंथी उमेदवार असलेल्या अंजली पाटील विजयी झाल्या आहेत. या निकालामुळे भादली बुद्रूकच्या गावकऱ्यांच्या या निर्णयाचं खरंच स्वागत करायला हवं. कारण तृतीयपंथींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. त्यांच्याकडेही जबाबदारी दिली तर ते नक्कीच लोककल्याणाची कामे करुन दाखवतील, असा विश्वास खेडेगावातल्या गावकऱ्यांनी दाखवला आहे. गावकऱ्यांच्या या पावालाने समाजाता एक सकारात्मक बदलास सुरुवात झाली आहे.