परळीमध्ये भव्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न, ४०० व्यक्तीहून अधिक व्यक्तींनी घेतला लाभ
बातमी मराठवाडा

परळीमध्ये भव्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न, ४०० व्यक्तीहून अधिक व्यक्तींनी घेतला लाभ

परळी : श्री ष.ब्र. १०८ वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली थोरला मठ संस्थान वसमत आयोजित वसमत श्री क्षेत्र कपिलाधार पदयात्रा मागिल १२ वर्षा पासुन आयोजित करण्यात येते. हजारो भाविकांचा त्या पदयात्रेत सहभाग असतो. या वर्षी भव्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले त्यात ४०० व्यक्तीहून अधिक लोकांनी घेतला शिबिराचा लाभ घेतला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

डॉ भाग्यश्री नरवाडे ह्या आरोग्य तपासणी शिबीरात तपासणी व समुपदेशन करत असताना.

रेवली फाटा, परळी जिल्हा बिड येथे डॉ भाग्यश्री नरवाडे (एम.डी. आयुर्वेद) यांच्या तर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तपासणी व समुपदेशनाचा सुमारे ४०० व्यक्तीहून अधिक लोकांनी शिबिराचा लाभ घेतला. शिबिरात मोफत रक्तदाब, मधुमेह तपासणी, सांध्यांचे विकार, हृदयरोग, मूत्राशयाचे आजार, अजीर्ण-अम्लपित्त, बालरोग, स्त्री रोग, इत्यादी प्रकारच्या अजारांवर डॉक्टरांनी मोफत उपचार, औषधे व सल्ला दिला.

डॉ भाग्यश्री नरवाडे यांनी सांगितले की, बहुतांश आजारांचे कारण चूकीचा आहारविहार असतो. आयुर्वेद भारताला मिळालेला खजिना आहे, आयुर्वेद हा अथर्वेदाचा उपवेद असून यात जीवन जगण्याचे महामंत्र दिलेले आहेत. आयुर्वेदातील दिनचर्या – ऋतुचर्या पालन केल्यास लाईफस्टाईल डिसऑर्डर जसे की उच्चरक्तदाब, मधुमेह इत्यादी आजार उत्पन्न होणार नाहीत किंवा आजार उत्पन्न झाल्यास आजार दुरुस्त होण्यास नक्कीच मदत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विष्णु राठोड, डॉ.शरद चोले, लॅब टेक्निशिअन व त्यांना अशोक कूबडे, छाया कुबडे, प्रा .संजय सोनटक्के ,विश्वनाथ कंधारकर ,वैजनाथ नरवाडे, .इंजि. आशीष कुबडे, सुनिता कुबडे, शुभम कंधारकर ,अमर नरवाडे व पदयात्रेतील स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले.