देश बातमी

गुजरातमध्ये पाचवी नापास आमदारानं रुग्णाला दिलं रेमडेसिवीर इंजेक्शन

अहमदाबाद : गुजरात येथील कामरेजचे भाजपचे आमदार व्ही. डी. झालावाडिया हे कोरोना रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शन देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरुन काँग्रेसने चौकशीची मागणी केली आहे. झालावाडिया हे सूरत महानगरपालिकेच्या सहकार्याने सुरू असलेल्या कम्युनिटी कोविड सेंटरमध्ये एका कोरोना रुग्णाच्या सलाईनमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन भरत होते. त्यानंतर त्यांनी रुग्णाला लावलेल्या सलाईनमध्ये ते इंजेश्कन सिरींज रिकामी केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

व्ही. डी. झालावाडिया हे स्वतः पाचवी नापास आहेत आणि अशा प्रकारे वैद्यकीय कर्मचाऱ्यांसमोर कोरोना रुग्णावर उपचार कसा करु शकतात असा सवाल काँग्रेसने केला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झालावाडिया यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मी गेल्या ४० दिवसांपासून सर्थाना कम्युनिटी हॉलमध्ये स्वयंसेवा करत आहे आणि करोना रुग्णांना मदत करीत आहे. कोणत्याही वादात पडण्याचा माझा हेतू नाही. मी फक्त रेमडेसिवीरचे इंजेक्शन सिरिंजमध्ये भरले आहे. कोणालाही इंजेक्शन दिले नाही. माझ्या जवळ त्यावेळी १०-१५ डॉक्टर उपस्थित होते. मी जवळपास २०० लोकांची मदत करुन त्यांनी घरी पाठवले आहे, असे झालावडिया म्हणाले.

यावर काँग्रेसचे प्रवक्ते जयराज सिंह यांनी झालवडिया यांच्यावर टीका केली आहे. वैद्यकीय कर्मचार्‍यांनी आमदाराकडून शिकले पाहिजे. रुग्णालयात आमदारांचा पुतळा देखील उभारालयला हवा असा टोला जयराज सिंह यांनी लगावला आहे.