सिक्स पॅक्सचा नाद, महागडी सप्लिमेंट्स घेतली; घोड्याचं इंजेक्शन टोचलं अन् मग…
देश बातमी

सिक्स पॅक्सचा नाद, महागडी सप्लिमेंट्स घेतली; घोड्याचं इंजेक्शन टोचलं अन् मग…

इंदूर: मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये विचित्र प्रकार घडला आहे. लवकरात लवकर सिक्स पॅक्स बनवण्यासाठी एका तरुणानं आयुष्यच पणाला लावलं. तरुणानं शरीर कमावण्यासाठी प्रोटिन पावडर घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याची प्रकृती बिघडू लागली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी दुकानदाराविरोधात विजय नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मोहित पाहुजा नावाच्या व्यक्तीकडून मास गेनर प्रोटिन पावडर, इंजेक्शन आणि काही गोळ्या घेतल्या होत्या. मात्र त्या चुकीच्या निघाल्या, असं पीडित जय सिंहनं पोलिसांना सांगितलं. पावडर, गोळ्या खाल्ल्यानंतर पोटदुखीचा त्रास सुरू झाला. सप्लिमेंट्ससाठी मोहितला खूप पैसे दिले होते. मात्र मोहितनं चांगल्या उत्पादनांच्या नावाखाली बोगस सामान दिलं. त्यामुळे माझी प्रकृती बिघडली, असा आरोप जयनं केला.

जय सिंह आधी विजय नगरात राहायचा. गौरी नगरातील जिममध्ये तो व्यायामाला जायचा. त्यामुळे त्याला मोहितचं दुकान माहीत नव्हतं. जयला सिक्स पॅक्स हवे होते. त्यासाठी तो मोहितच्या दुकानात गेला. मोहितनं त्याला बॅन असलेली इंजेक्शन्स दिली. चुकीची माहिती देऊन मोहितनं जयला इंजेक्शन्स दिली. पोलिसांनी मोहित पाहुजाच्या विरोधात फसवणूक आणि अन्य कलमांविरोधात गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई केली.

मोहितनं पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती दिली. पशुंना आणि कुत्र्यांना दिली जाणारी इंजेक्शन आणि औषधांचा वापर प्रोटिन तयार करण्यासाठी करतो. अवघ्या काही रुपयांमध्ये तयार होणारी प्रोटिन हजारो रुपयांना विकतो अशी कबुली मोहितनं पोलिसांना दिली.

इंदूरमध्ये एमआयजी पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी जिम ट्रेनर सोनू आणि त्याचा भाऊ रईसविरोधात गुन्हा दाखल केला होता. २० वर्षांच्या एजाझच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. सोनू आणि रईसनं एजाझला स्नानू बळकट करण्यासोबतच वजन वाढवण्याचं इंजेक्शन्स दिली होती. यामुळे एजाझच्या गुप्तांगाला सूज आली. त्याचे पाय दुखू लागले.