१४ वर्षीय विद्यार्थ्याचा इन्स्टा स्टेटस पाहून शाळा हादरली, शिक्षकांनी कपाळावरच हात मारला
पुणे बातमी

१४ वर्षीय विद्यार्थ्याचा इन्स्टा स्टेटस पाहून शाळा हादरली, शिक्षकांनी कपाळावरच हात मारला

पुणे : पुण्यात सध्या गुन्हेगारीचा प्रमाण वाढत असताना कुठे तरी त्याचा विपरीत परिणाम लहान मुलांच्या विचारांवर होताना दिसत आहे. रोडसाइड रोमियोंना पाहून लहान मुलं ही बिनधास्तपणे मुलींना प्रपोज करायला घाबरत नाहीत. असाच एक प्रकार पुण्यातल्या हाडपसार भागात घडला आहे. एका १४ वर्षाच्या शाळकरी पोराने स्वतःच्या instagram अकाउंटवर आपल्याच शाळेतील एका १३ वर्षीय मुलीचा फोटो ठेऊन बायको होशील का? असे स्टेटस ठेवले. हे पाहून शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांनी आपल्या कपाळावरच हात मारला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या गोष्टीचा गंभीर विचार करता मुलीच्या आईने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. शाळकरी मुलावर हडपसर पोलीस स्टेशनने पॉस्को कायद्या अंतर्गत तसंच विनयभंगाचा गुन्हा नोंद केला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी माहिती दिली आहे. यातील मुलगी आणि मुलगा हडपसर परिसरातील एका नामांकित शाळेत शिक्षण घेतात. दोघेही हडपसर परिसरात राहतात अनेकदा हा मुलगा माझा पाठलाग कारयाचा. माझ्यासोबत मैत्री कर अन्यथा तुला उचलून घेऊन जाईल, अशी धमकीही वारंवार देत होता, असं तक्रारीत म्हटलं आहे. परंतु याकडे मुलीने दुर्लक्ष केलं. मुलगी दुर्लक्ष करते हे पाहून आरोपी मुलाने तिचा फोटो काढून माझी बायको होशील का? असं स्टेटस इंस्टाग्राम अकाउंटवर ठेवलं होतं. त्यानंतर मुलीने हा सर्व प्रकार आईला सांगितला. आईने याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. अधिक तपास पोलीस करत आहेत.