हिमाचल प्रदेशात दरड कोसळून नऊ जणांचा मृत्यू; व्हिडिओ पाहाच
देश बातमी

हिमाचल प्रदेशात दरड कोसळून नऊ जणांचा मृत्यू; व्हिडिओ पाहाच

चंदीगढ : हिमाचल प्रदेशात दरड कोसळून नऊ पर्यटकांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत. सांगला खोऱ्यात ही दरड कोसळली आहे. दरड कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून डोंगवरावरुन दगडं वेगाने खाली खोऱ्यात कोसळत असल्याचं दिसत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

किन्नोरच्या बटसेरीत ही दुर्घटना घडली आहे. मृत झालेले सर्व ११ जण पर्यटक असून त्यांच्या वाहनांवर दगडं कोसळली अशी माहिती किन्नोरचे पोलीस अधिक्षक सॅजू राम राणा यांनी दिली आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांची एक टीम सध्या घटनास्थळी दाखल झाली आहे.

तिथे उपस्थित काही नागरिकांनी दरड कोसळतानाचा व्हिडीओ मोबाइलवर रेकॉर्ड केला आहे. यामध्ये दगडं तिथे पार्क असणाऱ्या गाड्यांवर वेगाने कोसळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.