एका दिवसात ३३ कि. मी. रस्तेबांधणीचा विक्रम
देश बातमी

एका दिवसात ३३ कि. मी. रस्तेबांधणीचा विक्रम

नवी दिल्ली : दररोज ३३ कि.मी. इतक्या लांबीच्या महामार्गाचे बांधकाम करून या क्षेत्रात एक नवा विक्रमी टप्पा गाठण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्गाच्या बांधकामात जागतिक विक्रम होत असतानाच हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या आर्थिक वर्षांत आतापर्यंत ११ हजार ३५ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे बांधकाम करून हा टप्पा गाठण्यात आला. आज पर्यंत आम्ही ११ हजार ३५ कि. मी. लांबीचे रस्ते बांधले, म्हणजेच एका दिवसात ३२.८५ कि. मी. लांबीच्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले आणि हा एक विक्रम आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत दररोज ४० कि. मी. लांबीच्या रस्त्याचे बांधकाम करण्यात येईल, अशी अपेक्षा असल्याचेही गडकरी यांनी माध्यमांना बोलताना सांगितले.

कोविड-१९ मुळे निर्बंध असतानाही हे उद्दिष्ट गाठण्यात आले, त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे, असेही गडकरी म्हणाले.