पुण्यात कोरोनाचा कहर! १५ दिवसांत कोरोनाने संपवलं अख्खं कुटुंब
पुणे बातमी

पुण्यात कोरोनाचा कहर! १५ दिवसांत कोरोनाने संपवलं अख्खं कुटुंब

पुणे : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला असाताना पुण्याता कोरोनाचा कहर सुरु असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाने अवघ्या १५ दिवसांत एक अख्खं कुटुंब संपवलं आहे. पुण्यातील जाधव कुटुंबातील चार जणांचा गेल्या १५ दिवसांत कोरोनाने मृत्यू झाला आहे. आई अलका जाधव, भाऊ रोहित जाधव, अतुल जाधव आणि बहीण वैशाली गायकवाड यांचा कोरोनामुळे १५ मृत्यू झाला. तर वडिलांचेही यापूर्वीच १५ जानेवारीला कोरोनाने निधन झाले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पूजेच्या निमित्ताने हे कुटुंब एकत्र आलं होतं. पूजेनंतर घरात कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर एकामागोमाग एक अशा पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे जाधव कुटुंबच संपलं आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. जाधव कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वी घरात पूजेचं आयोजन केलं होतं. या पूजेच्या निमित्ताने घरातील सर्वजण एकत्र आले होते. एकाच कुटुंबातील सर्वजण असल्याने ते काहीसे निश्चिंत होते. मात्र एकामागोमाग एकाला कोरोनाने गाठलं. पुढे त्यांची प्रकृती बिघडत गेली त्यात मागील १५ दिवसांत ४ जणांचा मृत्यू झाला.

पुण्यात कोरोनाची भीषण स्थिती
पुण्यातील कोरोना स्थिती बिकट होत चालली आहे. दररोज रुग्णवाढीचा वेग जोराने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रहिवाशांव्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना प्रवेश करण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे. तसेच नियमित सोसायटीमध्ये येणाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी आवश्यक आहे, असे आदेश पुणे महापालिकेने दिले आहेत.